Panjarapol Gorakshan Sanstha Uncategorized पांजरपोळ गोरक्षण संस्थेत गुलाबी थंडीत हुरडा महोत्सवाचे आयोजन( Source : Navamaratha Times)

पांजरपोळ गोरक्षण संस्थेत गुलाबी थंडीत हुरडा महोत्सवाचे आयोजन( Source : Navamaratha Times)

अहमदनगर- जगभरातील मानवजातीने अनेक वेळा मानवनिर्मित व नैसर्गिक संकटाचा सामना केला आहे. परंतु कोरोना महामारीच्या संकटाने संपूर्ण मानवजातीला हतबल करून सोडले आहे. लॉकडाऊनची परिस्थिती, अतिशय प्रतिकूल वातावरण असताना पांजरपोळ गोरक्षण संस्थेने आपले गोरक्षणाचे कार्य विनाखंड कायम ठेवलं आहे. आता सालाबादप्रमाणे गुलाबी थंडीचे आगमन होताच संस्थेने हुरडा महोत्सवाची तयारी पूर्ण केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा सर्व शासकीय नियम पाळून व सर्व आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करून संस्था खास हुरडा महोत्सवाची मेजवानी उपलब्ध करून देत आहे. संस्थेचा परिसर विस्तीर्ण असल्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे पालन शक्य होणार आहे.

हुरडा पार्टीसाठी येणारांनीही नियमांचे पालन करणे अपेक्षित आहे, असे संस्थेचे अध्यक्ष हस्तीमल मुनोत यांनी सांगितले. यावेळी संस्थेचे सेक्रेटरी किशोर मुनोत, उपाध्यक्ष सी.ए. रमेश फिरोदिया, अ‍ॅड. शरद पल्लोड, संजय बोरा, मनोज गुगळे, नंदलाल मणियार, नरेंद्र लोहाडे, विक्रम फिरोदिया, विजय कोथिंबीरे, प्रविण गांधी, योगेश चंगेडिया, जयकुमार शिंगवी, मॅनेजर महेश मुनोत, असिस्टंट मॅनेजर राजकुमार पितळे आदी उपस्थित होते. सी.ए. रमेश फिरोदिया यांच्या हस्ते हुरड्यासाठीची भट्टी प्रज्वलित करण्यात आली. संस्थेचे सेक्रेटरी किशोर मुनोत यांनी सांगितले की, संस्थेने दुधमोगरा या जातीच्या वाणाची हुरड्यासाठी पेरणी केलेली आहे. दुधमोगरा या जातीचा हुरडा मऊ, गोड लुसलुशीत असतो. तसेच त्याचे कच्चे दाणेही उपलब्ध होतात. हुरड्याबरोबर लागणारी चटणी, रेवडी, गोडीशेव, चहा, रस, कॉफी याचीही उपलब्धता असणार आहे. तसेच महाराष्ट्रीयन जेवण त्यामध्ये वांग्याची भाजी, भरीत, पिठल, ठेचा व इतर पदार्थही हुरडा पार्टीची लज्जत वाढवतील.

For more details click below link :

enavamaratha.com/188433/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

+ 42 = 47
Powered by MathCaptcha

Related Post